• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे विमा योजना शासनाने स्वत: राबवावी; कंपनीकडून शेतकर्‍यांची अडवणूक; योजना कंपनीकडून काढा; विधान परिषदेत अंबादास दानवेंची मागणी

by Beed Reporter
March 3, 2023
Reading Time: 1 min read
0
विधान परिषदेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांचं आयुष्य सुखकर व्हावं किंवा शेतकर्‍यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी नवनवीन योजना अमलांत आणतं. शेतकर्‍यांच्या शेतीपिकासाठी विमा योजना असते, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना अपघात झाल्यासही त्यांना मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू केली आहे. शेती व्यवसाय करत असताना अपघात झाल्यास या योजनेला लाभ संबंधित शेतकर्‍याला मिळतो. मात्र, ज्या कंपन्यांना या योजनेचं कंत्राट दिलंय, त्यांकडून बळीराजाची अडवणूक होत असते. त्यावरुन, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात प्रश्न उपस्थित केला. तसेच, शेतकर्‍यांकडे ही योजना शासनाने स्वत: राबवावी, अशी मागणीही केली.

विमा कंपन्यांकडून दलाली सुरू असते, शेतकर्‍यांची मोठी फसवणूक या कंपन्यांकडून केली जाते. विमा कंपन्यांना सरकार मोठ्या प्रमाणात पैसा देते, पण कंपन्यांकडून शेतकर्‍यांची अडवणूकच केली जाते. मग, सरकारने तहसिलदार आणि कलेक्टर्संच्या माध्यमातून शेतकर्‍यांना विमा देण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली.
गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना ही विमा कंपन्यांकडे न देता सरकारने स्वतः या योजनेचे जिल्हानिहाय वितरण तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेणार आहे का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जी यांनी उपस्थितीत केला. सरकारने थेट जरी शेतकर्‍यांना हा निधी दिला तरी, तो पुरतो. आपण जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय डिस्ट्रीब्युशन केल्यास ते शक्य होईल. विमा कंपन्या दलाली (पान 7 वर)
करत असतात. म्हणून, तहसिलदार किंवा कलेक्टर्संच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे. तसेच, सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केलीय. शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकर्‍यांना या अपघातामुळे अपंगत्व येते परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील, शेतकर्‍याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून आ.धनंजय मुंडेंचा सभात्याग

मुंबई (रिपोर्टर) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आ. धनंजय मुंडे यांनी आज विविध प्रश्न उपस्थित करत अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांचे मानधन वाढीत अंगणवाडी सेविकांना किमान 15 हजार तर मदतनिसांना किमान 10 हजार मानधन देण्याचे औदार्य सरकार दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र राज्य सरकारकडून याबाबत समाधानकारक उत्तर न आल्याने धनंजय मुंडेंनी सभात्याग केला.
सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2022 मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार अंगणवाडी कर्मचारी वैज्ञानिक पदावर असून त्यांना किमान वेतन देण्याची मागणी आज विधानसभेमध्ये आ. धनंजय मुंडे यांनी केली. अंगणवाडी सेविकांना 15 हजार तर मदतनिसास किमान 10 हजार रुपये मानधन देण्याचे औदार्य सरकार दाखवणार आहे का? हा प्रश्न उपस्थित केल्यावर सरकारकडून या प्रश्नाच्या उत्तराला बगल देण्याचे काम झाले. उत्तर समाधानकारक आले नाही त्यामुळे धनंजय मुंडेंनी सभात्याग केला.

कफ सिरफ तयार करणार्‍या
27 कंपन्या चौकशीच्या फेर्‍यात
राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणार्‍या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. 17 दोषी कंपन्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशान मंत्री संजय राठोड यांनी दिली.
देशातून निर्यात झालेल्या सदोष कफसीरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राज्यात तयार होणार्‍या विविध प्रकारच्या औषधाच्या गुणवत्ता तपासण्या (स्टॅबिलिटी स्टेट) झाल्यानंतरच जागतिक बाजारपेठेत पाठवणे बंधनकारक असताना राज्यातील 200 औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी 2000 पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी, 2023 मध्ये आढळून आले.

Previous Post

तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीची विष पिऊन आत्महत्या; शिवणी येथील घटना; आरोपी तरुणाविरोधात दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता

Next Post

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?