Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजचा पॉझिटिव्हचा आकडा ७०३

आजचा पॉझिटिव्हचा आकडा ७०३

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून गेल्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यातला आकडा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये ७०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ४७९७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ५५०१ जणांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले होते.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई -४२, आष्टी-९२, बीड २२६, धारूर -२५, गेवराई-६६, केज ६४, माजलगाव-३०, परळी-१५, पाटोदा-४६, शिरूर ४३, वडवणीमध्ये ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान इतर तालुक्याची पॉझिटिव्हची आकडेवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी बीडचा आकडा मात्र कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!