बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे रुग्णालयासाठी नवीन बांधकाम होत आहे. या बांधकामाच्या ठिकाणी रात्री तीस वर्षीय मजुराने लोखंडी एंगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. मजुराच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हा मजूर परराज्यातील आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे रुग्णालयाची भव्यदिव्य इमारत होत आहे. याठिकाणी काही मजूर कामाला असून सुरज लल्लन यादव (वय 30 वर्षे) हा देखील या ठिकाणी कामाला होता. तो उत्तर प्रदेश राज्यातील आहे. रात्री त्याने बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी एंगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मजुराच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.