जिल्हा रुग्णालयाच्या डायलिसीस विभागाला दहा वर्ष पूर्ण
आतापर्यंत 18 हजार रुग्णांनी घेतला लाभ
दररोज 16 रुग्णंाचे होतात डायलिसीस
बीड (रिपोर्टर)ः-जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सोयीसाठी दहा वर्षापुर्वी डायलिसीस विभाग सुरू करण्यात आला. यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगला लाभ मिळू लागला. डायलिसीससाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाण्याची गरज नाही. दहा वर्षात 18610 रुग्णांचे डायलिसीस करण्यात आले. दोन शिप्ट मध्ये दररोज 16 रुग्णांचे डायलिसीस करण्यात येते. आज जागतीक किडणी दिन आहे त्यानिमित्ताने डायलिसीस विभागाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
पुर्वी डायलिसीससाठी इतर ठिकाणी जावे लागत असे. राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात दहा वर्षापुर्वी डायलिसीस विभाग सुरू केला. त्यामुळे रुग्णांना लाभ होवू लागला. योजनेमध्ये मोफत तर इतरासाठी केवळ 150 रुपयात डायलिसीस केले जाते. 10 वर्षात 18610 रुग्णांचे यशस्वीरित्या डायलिसीस करण्यात आले. दोन शिप्टमध्ये डायलिसीस करण्यात येते. एका शिप्ट मध्ये 8 आणि दुसर्या शिप्ट मध्ये 8 अशा 16 रुग्णांचे रोज डायलिसीस होते. डायलिसीस प्रमुख डॉ.मनोज मुंडे, स्वाती माळी, डॉ.सायली राठोड, जयश्री घूनरड सह आदि कर्मचारी या विभागात काम पाहतात. आज जागतीक किडणी दिन आहे. त्यानिमित्ताने डायलिसीस विभागाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.










