बीड, (रिपोर्टर):- दोन अज्ञात व्यक्तीने एका व्यापार्याकडे चिल्लर मागण्याचा बहाणा करून नकळत गल्ल्यातील 90 हजार रूपये लंपास केल्याची घटना घाटनांदुर येथे दि. 10 मार्च रोजी घडली. याप्रकरणी काल अंबाजोगाई ग्रामिण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन विशाल काळदाते रा. आव्हाड शिरपुर ता.कळंब जि. उस्मानाबाद, ह.मु. घाटनांदुर यांच्याकडे दोन भामटे चिल्लर मागण्यासाठी आले होते. यावेळी त्या दोन्ही भामट्याने पवन यांची नजर चुकवत गल्ल्यातील 90 हजार रूपये लंपास केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पवन यांच्या लक्षात आल्यावरून त्यांनी काल अंबाजोगाई पोलीसात तक्रार दिली.










