Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमधुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...

धुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले


एकीला वाचविले मात्र दोघींना वाचवताना स्वत:चाही जीव गमावला
गेवराई (रिपोर्टर):- धुणं धुण्यासाठी गोदा पात्रात गोदापात्रात गेल्यानंतर सोबत असलेल्या तीन मुली पाण्यात खेळत असताना बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय महिलेसह दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मीरगाव नजीक घडली. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे तर एका मुलीला वाचवण्यात यश आले आहेत.

5


याबाबत अधिक असे की, मिरगाव येथील रंजना भागवत गोडबोले (वय 30 वर्षे), त्यांची मुलगी अर्चना भागवत गोडबोले, पुतणी शीतल हनुमंत गोडबोले (वय 18 वर्षे) व भावकीतील आरती बाबासाहेब गोडबोले या चौघी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावा नजीक असलेल्या गोदा पात्रात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. रंजना गोडबोले या धुणं धूत असताना तीन मुली गोदा पात्रातील पाण्यात खेळत होत्या. त्यावेळी अचानक त्या तिघीही खोल पाण्यात गेल्या.

6

तेव्हा ते पाण्यात बुडत असल्याचे पाहून मोठ्या हिमतीने रंजना गोडबोले यांनी पाण्यात जावून मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आरती गोडबोले हिस पाण्यातून उचलून गोदाकाठी आणून ठेवले तर अर्चना व शितल यांना वाचवण्यासाठी रंजना पुन्हा पाण्यात गेल्या मात्र रंजना अर्चना व शितल यांना वाचवत असताना या तिघीही पाण्यात बुडून मरण पावल्या. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पीएसआय माने, एएसआय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, अल्ताफ कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या घटनेने मिरगावावर शोककळा पसरली आहे.

तो धावला… त्याने प्रयत्न केले
रंजनासह मुली पाण्यात बुडत असताना आरडाओरड सुरू होता. त्यावेळी बाजुला मासे पकडणारा गोपाल बलिया याने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र घटनेची जागा आणि तो मासे पकडत असलेली जागा यातील अंतर बराच असल्याने तो घटनास्थळी वेळेत येऊ शकला नाही. तो तिथपर्यंत आला तोपर्यंत तिघेही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्या तिघींनाही गोपाल यानेच पाण्याबाहेर काढले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!