Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडनिराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत

निराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत


5675 अर्ज पडून; उद्याच्या बैठकीस सर्व प्रस्ताव निकाली निघणार का?

बीड (रिपोर्टर):- निराधारासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील शेकडो वयोवृद्धांना मिळतो. दरवर्षी त्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केले जात असतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले नाहीत. बीड तहसीलमध्ये 5675 प्रस्ताव पडून आहेत. या प्रस्तावासाठी उद्या आणि परवा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या बैठकीत सर्व प्रस्ताव निकाली निघणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


बीड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत शेकडो निराधारांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे. नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयामध्ये दाखल केले जात असले तरी या प्रस्तावावर योग्य वेळी निर्णय घेतले जात नसल्याने कित्येक महिने प्रस्ताव कार्यालयामध्ये धुळखात पडून असतात. बीड शहरासह ग्रामीण भागातील जवळपास 5675 प्रस्ताव तहसील
कार्यालयात पडलेले आहेत. सदरील हे प्रस्ताव 2018 ते 2021 या दरम्यानचे आहेत. उद्या 3 जून रोजी शहर कमिटीची तर नंतर ग्रामीण कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत समितीचे पदाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित राहणार असून या बैठकीत सर्व प्रस्ताव निकाली काढले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांनी-ज्यांनी प्रस्ताव दाखल केले ते वयोवृद्ध प्रस्ताव कधी निकाली निघतील याची अतुरतेने वाट पाहत असतात.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!