वडवणी (रिपोर्टर):- चार महीने कर्नाटक राज्यात ऊस तोडणीचे काम करून कारखानाचा पट्टा पडल्यानंतर परत आपल्या गावाकडे ट्रॅक्टर मध्ये बसून निघालेल्या ऊसतोड मजुराचा ट्रॅक्टर वरून पडून सोलापूर जवळ अपघात झाला. या अपघातात सदर ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला असून संदिपान अर्जुनराव साबळे असे या 43 वर्षीय ऊसतोड मजुराचे नाव आहे.सदरील घटना हि रात्री घडली आहे.
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी असलेले संदिपान अर्जुनराव साबळे हे ऊसतोड मजूर आपल्या पत्नीसह कर्नाटक राज्यामध्ये मागील चार महिन्यापूर्वी ऊसतोडणीसाठी गेले होते. मागील चार महिने त्यांनी ऊस तोडणीचे काम केले. कर्नाटक राज्यातील कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर ते आपल्या गावाकडे ट्रॅक्टर मध्ये बसून निघाले होते. त्यांचे ट्रॅक्टर सोलापूर जवळ आले असता त्यांच्या ट्रॅक्टरच्या समोर बसलेले संदिपान साबळे हे आदळ्याने खाली पडले व जखमी झाले. सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यांना तात्काळ दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मृतदेह श्वविच्छेदन करण्यासाठी सोलापुर येथील शासकिय रुग्णालयात ठेवण्यात आला असून आज दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत पिंपरखेड गांवी मृतदेह आणण्यात येणार आहे.यानंतर संदिपान साबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अशी माहिती ग्रामस्थ,नातेवाईकांकडून सांगण्यात आली असून एमडिएल या सोशिअल मिडिया वाहिनीचे संपादक ओमप्रकाश साबळे यांचे ते मोठे बंधू होते.तर मयत संदिपान साबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई- वडील,भाऊ असा परिवार आहे.
मयताचे कुटुंब उघड्यावर
संदिपान साबळे हे अत्यंत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील होते, राहायला घर नाही. केवळ एक एकर जमीनीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेती पिकत नसल्यामुळे ते यावर्षी कारखान्याला गेले होते. कर्जाचाबोजा फेडावा या उद्देशाने कारखान्याला गेलेल्या संदिपान साबळे यांच्यावर ऊसतोडणी करुन परत येत आसताना चालता बोलता काळाने घाला घातला आणि यात कुंटुब प्रमुख असलेले संदिपान साबळे यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.