Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडबियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोंढ्यात

बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोंढ्यात

जिल्ह्यात ७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात होणार खरीपाचा पेरा
साडेचार लाखापर्यंत कापसाची तर दोन लाखापर्यंत सोयाबीनचा लागवड होईल
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकरी आता बि-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडे दिसून येत आहे. आजपासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने बीड शहरासह तालुका परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी आज कृषी दुकानदाराकडे जावून कापुस, बाजरी, मुग, तुर, भुईमुग यासह इतर बियाणांची खरेदी करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात दरवर्षी खरीपाची सात ते साडेसात लाख हेक्टरमध्ये लागवड होत असते. यंदाही तितक्याच क्षेत्रात लागवड होईल. कापसाचे चार लाखापर्यंत क्षेत्र आहे तर सोयाबीन २ लाख हेक्टरपर्यंत लागवड होर्ईल यासह बाजरी, तुर, मुग, मटकी इतर पीकाची कमी क्षेत्रामध्ये लागवड होवू शकते.


गेल्या वर्षीपासून पाऊस चांगला पडत आहे. यावर्षीही मान्सुनपुर्व पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. सर्वच तालुक्यामध्ये पाऊस पडल्याने शेतकर्‍यात समाधान व्यक्त केले जात आहे. आजपासून लॉकडाऊन काही प्रमाणात उठवल्याने बाजारातील सर्व दुकाने उघडण्यात आलेली आहेत. त्यातच शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडे दिसून येत आहे. बीड शहरासह सर्व तालुक्यातील कृषी दुकानदाराकडे शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात साडेसात लाखापेक्षा जास्त हेक्टरमध्ये दरवर्षी खरीपाची पेरणी केली जाते. यात चार ते साडेचार लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होते. दोन ते अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आणि इतर क्षेत्रात बाजरी, मुग, उडीद, मटकी, भुईमुग यासह इतर खरीप पीकांची लागवड होईल. मान्सुनपुर्व पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीतील मशागतीला सुरूवातत केली तर ज्या शेतकर्‍याकडे पाणी आहे अशा शेतकर्‍यांनी ठिबकच्या सहाय्याने कापसाची लागवडही केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!