Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाअनलॉक, रस्ते ब्लॉक पुन्हा लागेल कोरोनाचा शॉक कोरोनाच्या पहिल्याच दिवशी दुकाने...

अनलॉक, रस्ते ब्लॉक पुन्हा लागेल कोरोनाचा शॉक कोरोनाच्या पहिल्याच दिवशी दुकाने तुडूंब; रस्त्यावर ठिकठिकाणी गर्दी, अनेक भागात ट्रॅफिक जाम, सोशल डिस्टन्सचा फज्जा

कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर शासनाच्या नियमाचे पालन करा
बीड (रिपोर्टर):- रेडझोनमध्ये असलेला बीड जिल्हा गेल्या आठवडाभरापासून ग्रीन झोनमध्ये येत असतानाच जिल्हा प्रशासनाने सशर्थ अनलॉक करत सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत काही व्यवसाय सुरू करण्यास मुभा दिल्यानंतर आज अनलॉकच्या पहिल्याच दिवशी बीड शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसले. अनेक दुकानांवर तोबा गर्दी पहावयास मिळाली. शहरातल्या अनेक चौकांमध्ये रस्ते जाम झाले. नागरिकांनी दाखवलेल्या बेशिस्तपणाच्या वर्तवणुकीने पुन्हा कोरोनाचा शॉक जिल्हावासियांना बसेल काय? अशी भीती व्यक्त होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना योद्धा होत तिसरी लाट रोखण्यासाठी सोशल डिस्टन्ससह मास्कचा वापर करावा.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे लोकांचे उद्योग-धंदे-व्यवसाय बंद आहेत.

सर्वसामान्य व्यवसायीक मेटाकुटीला आला आहे. जान है तो जहॉं है, अशी स्थिती आजची आहे. म्हणून जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. रेडझोनमध्ये असलेला बीड जिल्हा गेल्या आठवडाभरापासून ग्रीन झोनमध्ये आला आहे. तीन हजारापेक्षा जास्त संशयितांच्या चाचण्या केल्यानंतर दोनशेच्या आत बाधित अढळून येत आहेत. या परिस्थितीत कोरोना अद्याप समुळ नष्ट झाला नसल्याचे स्पष्ट होते. अशा स्थितीतही जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या पाहून जिल्ह्यात आजपासून अनलॉक केले. काही उद्योग, व्यवसाय, धंद्यांना सशर्थ परवानगी देत सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत खरेदी-विक्रीस परवानगी दिली मात्र अनलॉकच्या पहिल्याच दिवशी बीड शहरात नागरिकांची जी झुंबड पहावयास मिळाली ती कोरोनाला आमंत्रण देणारी होती. अनेक चौकांमध्ये रस्ते जाम झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती. अनेक दुकानात लोक गर्दी करून होते. रस्त्यावरील बहुतांश नागरिकांनी मास्क लावलेले नव्हते. सोशल डिस्टन्स पाळले नाही. हीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कोरोना डोके वर काढेल. त्यामुळे कोरोनाला समुळ नष्ट करण्याहेतु जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करत शासनाच्या नियमांचे पालन करावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!