Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमरांजणी जवळ सापडलेल्या "त्या" मयताचा खुन.?

रांजणी जवळ सापडलेल्या “त्या” मयताचा खुन.?

मयताची पत्नी व अन्य एका संशयितासह टवेरा गाडी ताब्यात

गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील राजंणी जवळ काल एकाचा संशयास्पद मृत्यु आढळला होता याची ओळख पटत नव्हती ओळख पटवण्याचे अवाहन गेवराई पोलीसांनी केले होते परंतू तपासाचे चक्र गतिमान करूण या प्रकरणी या सापडेल्या मयताचा खुन झाला असल्यांचा संशय व्यक्त करण्यात येत असुन गेवराई पोलीसांनी या प्रकरणी मयताची पत्नी व एक संशयीतांसह पांढ-या रंगाची टवेरा गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी कि, संपत भावडू मराठा ( वय ४५ ) राहणार मनकवार पहाडीपार , मोहल्ला बगरूळ , जिल्हा हरदा मध्यप्रदेश मयताचे नाव असुन सदरचा ईसम हा परराज्यातील मध्यप्रदेश येथील आहे व तिन जन एकाच टव्हेरा गाडीतून प्रवास करत होते ( दि.७ रोजी ) यातील एकाचा रांजणी जवळ एकाचा मृतूदेह मृत अवस्थेत सापडला असता प्रथमर्दशनी हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. परंतु गेवराई पोलीसांनी मयताची ओळख पटावी म्हणुन अवाहन देखील केले होते परंतू या प्रकरणी कोनीही आले नाही व तपासा दरम्यान सदरच्या व्यक्तीचा खुन झाला असल्याचे गेवराई पोलीसांच्या निर्दशनास आले यानंतर एका हॉटेल चालकाच्या माहितीवरून एक पांढऱ्या रंगाची टवेरा व यामध्ये एक महिला व तीन जण असे एकूण चौघे आपल्या हॉटेल वरून जेवण गेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तापसाला गती दिली असता पाडळशिंगी टोलनाक्याजवळील एका हॉटेल वर ही टवेरा गाडीसह एक महिला व एक पुरुष आढळून आले यांना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता यातील महिला ही त्या मयताची पत्नी असल्याचे निदर्शनास आले तर सोबत असलेला गाडीचा चालक आणि महिला अनैतिक संबंध असून त्यातूनच हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रफुल्ल साबळे, पो.कॉ.शेळके, कैलास खटाने, जायभाये, अमोल खटाने यांनी केली असून ताब्यात घेलेल्यांपैकी मयताची पत्नी व दुसरा गाडीचा चालक यांची चौकशी करून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Most Popular

error: Content is protected !!