Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमकुपुत्राच्या मारहाणीत आईचा मृत्यू, पिता कोमात ‘फादर्स डे’च्या पुर्वसंध्येला घाटशीळ पारगाव येथे...

कुपुत्राच्या मारहाणीत आईचा मृत्यू, पिता कोमात ‘फादर्स डे’च्या पुर्वसंध्येला घाटशीळ पारगाव येथे घडली घटना


बीड (रिपोर्टर):- मुलगा हवा म्हणून असा हट्ट आई-वडिलांचा असतो, मात्र काही दिवटे मुलं आपल्या आई-वडिलांचे कशा पद्धतीने पांग फेडतात याचे उदाहरण समोर येते. शिरूर कासार येथील घाटशीळ पारगाव येथे अशीच एक संतापजनक घटना समोर आली. दिवटा मुलगा हा आपल्या आई-वडिलांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल आई मरण पावली तर वडिलांवर उपचार सुरू आहेत.


शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत मुलाने आपली आई शहाबाई त्रिंबक खेडकर (वय ७०) आणि वडिल त्रिंबक विश्‍वनाथ खेडकर (वय ७५) यांना शनिवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ एकाने व्हायरल केल्याने हा विकृतपणा समोर आला. जखमी झालेल्या माता-पित्यास नगर येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शहाबाई यांचा मृत्यू झाला आहे. मुलगाच हवा म्हणून आई-वडिलांचा हट्ट असतो मात्र मुलगा आपला पांग कशा पद्धतीने फेडतो याचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. अनेक दिवटे मुलं जीवंतपणी आपल्या आई-वडिलांना त्रास देण्याचे काम करतात. बाबासाहेब खेडकर याने पितृदिनाच्या संध्येला आपल्या आईवडिलांना मारहाण करून आपली सैतानी वृत्ती दाखवून दिली. अशा या विकृत मुलाविरोधात समाजात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे एपीआय रामचंद्र पवार यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली मात्र या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल नाही.

Most Popular

error: Content is protected !!