Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमपाच लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या

पाच लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या


पतीसह सासूविरोधात ३०६ नुसार गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर):- लग्नात राहिलेली हुंड्याची पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन का येत नाही या कारणावरून एका २० वर्षीय विवाहित महिलेचा छळ होत असे. या छळाला कंटाळून सदरील महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना शाहूनगर भागात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासुविरोधात ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पल्लवी विनोद जानवळे (वय २०) या महिलेचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. लग्नामध्ये ५ लाख रुपये हुंडा राहिल्याने तिचा पती व सासू सातत्याने छळ करत असे. या छळाला कंटाळून महिलेने रात्री आपल्या शाहूनगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी पंचनामा केला. आरोपी पती व सासू विरोधात कलम ४९८, ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!