शिस्तीचे पालन न करणार्या वाहनधारकांना डोस
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये वाहनधारक आपली वाहने आडवी-तिडवी उभी करत असल्याने याचा त्रास येणार्या जाणार्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. रुग्णालयचाया आवारात सेक्युरिटी गार्ड असताना काही वाहनधारक सेक्युरिटीला न जुमानता कुठेही गाड्या उभ्या करतात. अशा वाहनधारकांना आज चांगलाच डोस देण्यात आला. दोनशे गाड्यांची हवा सोडून देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्णांवर उपचार होत असतात. रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात येतात. वाहनधारक आपल्या गाड्या पार्किंगमध्ये न लावता कुठेही आडव्या तिडव्या लावत असतात. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीला तोंड द्यावे लागते. वैद्यकीय अधिकार्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. काही वाहनधारक सिक्युरिटी गार्डला न जुमानता नको त्या ठिकाणी गाड्या उभ्या करत असतात. आज आडव्या तिडव्या गाड्या लावणार्यांना चांगलाच डोस देण्यात आला. दोनशे गाड्यांची हवा सोडण्यात आली होती.