Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनापरळीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला

परळीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला

परळी (रिपोर्टर):- शहरातील वडसावित्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेचा मृतदेह याच भागातील एका विहीरीत आढळला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती.दरम्यान ही आत्महत्या की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरातील वडसावित्रीनगर या भागातील विवाहित महिला दि.१९ रोजी घरातून बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलीसांकडे करण्यात आली होती. सौ.कोमल सोमनाथ पडुळकर वय १९ वर्षं असे या मयत महिलेचे नाव आहे.दि.१९ रोजी ही महिला पहाटे ६ वा.सुमारास सडा टाकण्यासाठी शेण घेउन येते म्हणून घराबाहेर पडली होती ती परत आलीच नाही.कुटुंबियांनी शोधाशोध केली पण शोध लागला नाही त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. सात महिन्यांपूर्वी च या महिलेचा विवाह झाला होता. दरम्यान वडसावित्रीनगर भागातील एका विहीरीत मृतदेह तरंगताना आढळून आला.शहर पोलीसांनी आज दि.२२ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे का घातपात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.अधिक तपास पोलीस जमादार गोविंद बडे हे करीत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!