Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडशिवसेनेने जिल्ह्यात ग्रामीणचे पदाधिकारी बदलले जिल्हाप्रमुखपदी जाधव तर उपजिल्हाप्रमुखपदी वरेकर, कुलकर्णी

शिवसेनेने जिल्ह्यात ग्रामीणचे पदाधिकारी बदलले जिल्हाप्रमुखपदी जाधव तर उपजिल्हाप्रमुखपदी वरेकर, कुलकर्णी


बीड (रिपोर्टर):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून लातूर आणि बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. बीडमध्ये ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी, माजलगावचे अप्पासाहेब जाधव तर उपजिल्हाप्रमुखपदी गणेश वरेकर, शिवाजी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.


शिवसेनेच्या मुखपत्रातून लातूर, बीड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची निवड आज घोषीत करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांची निवड प्रामुख्याने करण्यात आल्याचे दिसून येत असून माजलगाव, परळी, केज विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख म्हणून आप्पासाहेब जाधव यांची तर बीड, शिरूर, पाटोदा विधानसभा कार्यक्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून गणेश वरेकर व केज, अंबाजोगाई विधानसभा कार्यक्षेत्रासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून शिवाजी कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!