बीड (रिपोर्टर) बीड शहरात जागोजागी अनाधिकृत होर्डींग लावल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनही केले आहे. मात्र तरी देखील शहरातील अनाधिकृत होडींगवर कारवाई होत नाही. त्यामुळे थेट या प्रकरणी मुख्य न्यायाधीश हेमंत महाजन यांनाच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने अनाधिकृत होर्डींगबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली पुढारी, नागरीक आणि नगरपालिका प्रशासनाकडून होत आहे. याबाबत आता मुख्य न्यायाधिशांनी न्यायालयाचा अवमान करणार्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिले आहे.