Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमदुचाकी समोरासमोर धडकल्या दोघांचा मृत्यू, पोलीस कर्मचारी गंभीर

दुचाकी समोरासमोर धडकल्या दोघांचा मृत्यू, पोलीस कर्मचारी गंभीर


बीड (रिपोर्टर): रामनगर येथील आरटीओ कार्यालयाकडून रॉंग साईडने येणार्‍या दुचाकीला बीडवरून गेवराईकडे जाणार्‍या पोलीसाच्या बुलेटने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर बुलेटवरील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री ११:३० वा. घडली.
तुकाराम सूर्यभान जगताप (वय ४७) रा.भवानवाडी, दत्ताभाऊ भानुदास शिंदे (वय २८) रा.भवानवाडी हे रात्री ११:३० वा. दूचाकी क्र.एम.एच. २३ बी.ए. २८९८ वरून नामलगावकडून बीडकडे रॉंग साईडने येत होते. यावेळी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत असलेले अजय जाधव हे बीडवरून गेवराईकडे बुलेट क्र. एम.एच.२३ एएम २२१४ ने जात होते. त्यावेळी आरटीओ ऑफीस जवळ दोन्ही दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने यामध्ये तुकाराम जगताप आणि दत्ता भाऊ शिंदे यांचा मृत्यू झाला तर बुलेटवर असलेले पोलीस अजय जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही मयताचे दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे, बिट अंमलदार उद्धव जरे यांनी धाव घेतली.

Most Popular

error: Content is protected !!