Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यभरात आंदोलन करणार्‍या भाजप नेत्यांना अटक

राज्यभरात आंदोलन करणार्‍या भाजप नेत्यांना अटक


मुंबई (रिपोर्टर):- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृ्‌त्वाखाली आंदोलन सुरु असून त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवणी दरेकर यांना ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मुलुंड इथं आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.

Most Popular

error: Content is protected !!