Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडभूमिअभिलेख कार्यालयाला १० हजार रुपयांचा दंड, मोजणीची माहिती दिली नाही

भूमिअभिलेख कार्यालयाला १० हजार रुपयांचा दंड, मोजणीची माहिती दिली नाही


बीड (रिपोर्टर):- शहरातील तरफ गिराम येथील मोजणीबाबतची माहिती उपभूमिअभिलेख कार्यालयाकडे मागवण्यात आली होती मात्र कार्यालयाने माहिती दिली नसल्याने याबाबत राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. माहिती आयोगाने भूमिअभिलेख कार्यालयास दोषी ठरवत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.


ऍड. अशोक शेटे यांनी सर्व्हे नं. ३२ / ३३ तरफ गिराम या संदर्भात मोजणीबाबत माहिती मागवली होती. सदरील माहिती उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय यांच्याकडून देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार माहिती आयोगाने भूमि उपअभिलेख कार्यालयाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सर्व्हे नं. गिरामची नगर भूमापन करून मोजणी व बीड शहर नगर भूमापन हद्दीतील तरफ गिराम सर्व्हे नं. ३०, ३१, ३५, ३६, ३७, ३८, ७५, ७६, ७७ व तरफ बलगुजर सर्व्हे नं. १८९ व २११ यांचे नगर भूमापन क्र. ९१२२, ९२२१, ९९२८, ९९२९, ९२६१, ९२१३, ९२५८ या मिळकतीची मोजणी फेब्रुवारी २०११ पासून आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी व गुरुवारी होणार असल्याचे एका वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आले होते. याची माहिती ऍड. शेटे यांनी संबंधित कार्यालयाकडे मागवली होती मात्र त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे माहिती आयोग खंडपीठाने कार्यालयाला दहा हजार रुपये दंड ठोठावला. शेटे यांच्या कार्याबाबत शेख इसाक सहसचिव बीड जिल्हा कुस्तगीर परिषद, ऍड. एस.एम. वडमारे, ऍड. राहुल साळवे, ऍड. एस.टी. गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!