केजच्या कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा
केज (रिपोर्टर) केज तालुक्यातील कासारी, तांबवा, कोल्हेवस्ती याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्याने विजेअभावी नागरिकांचे हाल होऊ लागले. आज संतप्त नागरिकांनी केजच्या विजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या वेळी अनेक महिलांसह नागरिकांची उपस्थिती होती. तात्काळ विजेचा पुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली.
कासारी, तांबवा, कोल्हेवस्ती या ठिकाणी लाईट नसल्याने गावातील नागरिकांना इतर ठिकाणावरून पाणी आणण्याी वेळ आली. इतरही अनेक सुविधा लाईटअभावी बंद पडलेल्या आहेत. विजेचा पुरवठा करण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांकडे वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी विजपुरवठा करत नसल्याने आज तांबवा येथील संतप्त महिलांनी विज वितरण कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या वेळी महिलांनी आपला संताप व्यक्त करत तात्काळ विजपुरवठा करण्याची मागणी केली. विजपुरवठा वेळेवर सुरू न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.