Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनामानाच्या पालख्यांना पायी वारीस परवानगी पण......

मानाच्या पालख्यांना पायी वारीस परवानगी पण……

आळंदी : आषाढी वारीसाठी शासनाने पायी वारीसाठी पंढरपूर तालुक्यातील वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरपर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांना चाळीस वारकऱ्यां परवानगी दिली आहे. ईसबावी येथील विसावा मंदिरापासून पुढे पंढरपूरापर्यंत साडे तीन किमीचे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे एकत्रीत मिळून केवळ 20 वारकरी पायी जातील. ही परवानगी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाने दिली असून तसा आदेश कक्ष अधिकारी हितेंद्र फुफारे यांनी दिला. मात्र सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत जेष्ठ वद्य सप्तमीला गुरूवारी (ता.१) देहू येथून जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान पैठण येथून होईल. आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता.२) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई आणि माता रूक्मीणी मातेच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यापूर्वीच झाले. आता सर्व पालख्या प्रस्थाननंतर गावातच राहतील आणि आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला पंढरपूरला एसटीने आषाढी एकादशीसाठी मार्गस्थ होवून वाखरी येथे पोचतील. वाखरीत गेल्यानंतर मात्र मानाच्या पालख्यांना परंपरेनुसार चालण्याची परवानगीसाठी सर्व देवस्थान आग्रही होते. त्याप्रमाणे मागणीला यश आले. यामुळे आता शासनाच्या निर्देशानुसार आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर वारकऱ्यांव्यतिरिक्त साडे तीनशे वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. देहू येथे जगतगूरू संत तुकाराम महाराज प्रस्थान सोहळ्यामध्ये शंभर वारकऱयांव्यतीरिक्त अडीचशे वारकऱ्यांना दर्शनासाठी शासनाने परवानगी दिली

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!