Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडआज पॉझिटिव्हची संख्या वाढली एकट्या पाटोद्यात ४१ पॉझिटिव्ह

आज पॉझिटिव्हची संख्या वाढली एकट्या पाटोद्यात ४१ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)ः- आष्टी पाटोदा, शिरुर या छोट्या तालुक्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत असतांना आष्टी-पाटोदा शिरुर मध्ये मात्र कोरोनामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून याच तिन तालुक्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यातील आकडा वाढला असून १५९ पॉझिटिव्ह आलेले आहे.


आरोग्य विभागाला आज दुपारी ३८७० संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये ३७११ जण निगेटिव्ह आढळून आले तर १५९ पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह मध्ये पाटोद्यात सर्वाधीक बाधीत असून आकडा ४१ वर गेला आहे. त्याच बरोबर अंबाजोगाई २, आष्टी-२४, बीड-२४, धारुर-२१, गेवराई-१४, केज-७, माजलगांव-४, परळी-२, पाटोदा-४१ शिरुर -८ आणि वडवणी तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!