Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनासव्वाशे वर्षांची परंपरा यंदाही खंडीत गहिनीनाथगडासह अन्य गडांची वारी यंदाही मुकली

सव्वाशे वर्षांची परंपरा यंदाही खंडीत गहिनीनाथगडासह अन्य गडांची वारी यंदाही मुकली


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या वैश्‍विक महामारीने अवघे जग घरबंद केल्यानंतर गेल्या शतकानुशतके परंपरा असलेली पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी यावर्षीही वारकर्‍यांसाठी दुर्लभ झाली असून गेल्या शे-दिडशे वर्षापासून बीड जिल्ह्यातून जाणार्‍या सहा प्रमुख पालख्यांनाही यावर्षी परवानगी देण्यात आली नसल्याने वारकर्‍यांची यंदाही वारी होत नाही.


बीड जिल्हा हा थोर संत, समाजसुधारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडकोटांचा आणि संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बीड जिल्ह्यातून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन आषाढीला घेण्यासाठी बीडमधून अनेक छोट्या-मोठ्या पालख्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने नारायणगड, गहिनीनाथ गड, बंकटस्वामी महाराज, मच्छिंद्र गड, रामगड आणि भगवानगड येथील पालख्या या रवाना होत असतात मात्र यावर्षी या पालख्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परवानगी देण्यात आली नाही. गहिनीनाथगड, नारायणगड, बंकटस्वामी महाराज यांची पालखी गेल्या सव्वाशे वर्षांपासून पंढरीस जात आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या पालख्यांना परवानगी मिळत नसल्याने बीड जिल्ह्यातला वारकरी
देव बोलतो बाळ मुखातून,
देव डोलतो उंच पिकातून
यावर समाधान व्यक्त करत विठ्ठलाचे नाम:स्मरण करत आहे. जिल्ह्यातून नामदेवाची पालखी पुढे जाते. अंबााजेगाई या ठिकाणी रिंगण असते. तर संत मुक्ताई गोविंद महाराजांची भेट घेण्यासाठी बीड मुक्कामी असतात. यावर्षी हा सोहळा याची देही याची डोळा बीडकर पाहण्यास मुकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!