जिल्ह्यात खळबळ, कुमावतांची धाडसी कारवाई
केज(रिपोर्टर)- सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना चंदन तस्काराची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तस्करात ताब्यात घेवून चंदन कोठे लपवून ठेवले याची माहिती विचारल्यानंतर होळ येथील एका जीम मध्ये चंदन असल्याचे तस्कारांनी सांगितले. त्यानूसार पोलीसांनी जिमची झाडाझडती घेतल्यानंतर या जिममध्ये 45 किलो चंदनासह एक गावठी कट्टा, एक पिस्टल, दोन लोखंडी कोयते, पंधरा जिवंत काडतूस यासह इतर घातक साहित्य जप्त करुन तिन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या धाडसी कारवाईने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, हनुमंत मधुकर घुगे रा.होळ हा चंदनाची तस्करी करत आहे. सध्या तो होळ शिवारात असल्याचे सांगण्यात आले. त्यानूसार पोलीसांनी घटनास्थळी जावून रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याठिकाणी दोघे जण आढळून आले. हनुमंत घुगे व चंदनशिव मेघराज गायकवाड रा.तांदुळ ता.जि. लातूर या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून 45 किलो चंदन , दोन मोटार सायकल, मोबाईल, लोखंडी तराजू असे साहित्य जप्त करण्यात आले. अन्य माल (पान 7 वर)
कोठे ठेवला याची माहिती संबधीत आरोपीकडे विचारले असता त्यांनी होळ येथील जिम मध्ये असल्याचे सांगितले. पोलीसांनी जिमची झाडाझडती घेतली असता. त्याठिकाणी मोठे घातक शस्त्र आढळून आले. दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू, एक गावठी कट्टा, सात जिवंत काडतूस,एक गावठी पिस्तल, आठ जिवंत काडतूस असा एकूण 2 लाख 84 हजार 400 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हनुमंत मधुकर घुगे रा.होळ, चंदनशिव मेघराज गायकवाड, तांदुळजा व माल घेणारा व्यापारी अशा तिन आरोपी विरोधात युसूफवडगांव पोलीस ठाण्यात हेड कॉन्सेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून कलम 379, 34 भादवी सह 41, 42, 26(एफ) भारतीय वन अधिनियम व 3/25, 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, बालाजी दराडे, राजु वंजारे, विकास चोपणे, गोविंद मुंडे, बजरंग इंगोले, मुकूंद ढाकणे, शिनगारे यांनी केली.