अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी
आष्टी ग्रामसेवक संघटने कडून काळ्याफिती बांधून निषेध
आष्टी( रिपोर्टर ):- अक्षय विधाते
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालनात काही व्यक्तीने गोंधळ घातला या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई १४६ या ग्रामसेवक संघटनेच्या वतीने संपूर्ण दिवसभर काळ्या फित बांधून निषेध नोंदवण्यात आला कामकाज करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की ११ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालनात काही व्यक्तींनी गोंधळ घातला सदर व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून कर्तव्यदक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यास भविष्याचा त्रास होणार नाही त्यासाठी १२ मे रोजी
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई १४६ या संघटनेच्या सर्व ग्रामसेवकांनी निषेध म्हणून संपूर्ण दिवसभर काळ्या फित बांधून कामकाज करुन निषेध व्यक्त करत हम सब एक है अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या तहसिलदार विनोद गुंडमवार यांना ही निवेदन देण्यात आले गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,विस्तार अधिकारी-गोकुळ बागलांनी, बाळासाहेब जायभाये,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खिलारे, जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब जगताप,सचिव त्र्यंबक मुळीक, उपाध्यक्ष नवनाथ लोंढे,विस्तार अधिकारी ,दत्ता घोडके,बलभिम परकाळे, हरिभाऊ तांदळे, संतोष भोरे, गोवर्धन सायंबर, भागवत अनारसे,सुनिल बोरुडे,ग्रामसेविका-आदक, दिपाली गायकवाड,उज्वला थोरवे,अनिता कवडे, ग्रामसेवक-हनुमंत गायकवाड, रामेश्वर भवर,श्री प्रसाद आरु,खेडकर बी.आर,आदी उपस्थित होते.