Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडडीएमचे काम मॅराथॉन, दिवसात दहा-दहा बैठका; खात्याचे काम अपटुडेट, जिल्ह्यासह मतदारसंघावर बारीक...

डीएमचे काम मॅराथॉन, दिवसात दहा-दहा बैठका; खात्याचे काम अपटुडेट, जिल्ह्यासह मतदारसंघावर बारीक लक्ष


बीड (रिपोर्टर):- संधी मिळेल तिथे संघर्ष करत काम करण्याची हातोटी असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची काम करण्याची पद्धत मॅराथॉनसारखी असल्याचे आता रोज दिसून येत असून दहापेक्षा अधिक बैठकांसह लोकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देणारा लोकप्रतिनिधी म्हणून राज्यभरात धनंजय मुंडेंची ओळख निर्माण होत आहे. आज दिवसभरात धनंजय मुंडे यांच्या तब्बल १० बैठकी असून या बैठकी नुसत्या वांझोट्या नसतात तर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जातो आणि त्याची अंमलबजावणी होते. जेवढं महत्व आपल्या खात्याला दिलं जातं, तेवढेच महत्व पालक म्हणून जिल्ह्याला आणि मतदारसंघ म्हणून परळीला धनंजय मुंडेंकडून दिला जात असल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागत आहेत.
विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर आल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत राज्यातच नव्हे तर देशात विरोधी पक्षनेता कसा असावा हे दाखवून दिले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी आली. आजपर्यंत या खात्याकडे कोणाचे लक्ष जात नव्हते मात्र धनंजय मुंडे यांनी या खात्यालाच न्याय दिला आणि या खात्यामार्फत जेवढे काही विषय असतील ते विषय तात्काळ सोडवत विद्यार्थ्यांसह दिनदलित, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा सपाटा सुरू ठेवला. डीएमचे काम म्हणजे मॅराथॉन असल्याची चर्चा आता राज्यभरात होत असून रोज दहादहा बैठका घेऊन कामात व्यस्त राहणारे धनंजय मुंडे कुठलेही काम अर्धवट ठेवत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या कामाचा अहवाल ते पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना प्रति महिन्याला देतात. आज दिवसभरामध्ये धनंजय मुंडे यांच्या सह्याद्री अतिथी गृहात तब्बल ९ बैठका असून दहावा कार्यक्रम हा पुस्तक प्रकाशानाचा आहे. त्यानंतरही लोकांशी संवाद ते साधणार आहेत. सामाजिक न्याय मंत्रालयात काम करताना ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी स्वत:ला झोकून दिले आहे त्याच पद्धतीने जिल्ह्यातले पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्‍नावर त्यांचे लक्ष असते. गेल्या दोन वर्षात कोविडमध्ये दोन वेळा कोरोना झाल्यानंतरही धनंजय मुंडेंनी बीडमध्ये ५० च्या आसपास बैठका घेतल्या. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील जो व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन आलेला असेल त्याचे काम मुंडेंनी फत्ते केल्याचे आजपर्यंत निदर्शनास आले. जिल्ह्याबरोबर परळी मतदारसंघातही ते वेळ देत असून मतदारांशी त्यांची नाळ अद्यापही तेवढीच जोडून आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!