Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमसिरसाळ्यात चोरटयांचा धुमाकूळ सोन्याचे दुकान फोडण्यासाठी चोरट्यांनी पाच दुकाने फोडले

सिरसाळ्यात चोरटयांचा धुमाकूळ सोन्याचे दुकान फोडण्यासाठी चोरट्यांनी पाच दुकाने फोडले


सिरसाळा (रिपोर्टर):- परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रात्री भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका लाईनित असलेल्या पाच दुकाने फोडल्या. ज्या दुकाना फोडल्या त्या सर्व दुकानांवर वैद्यनाथ ज्वेलर्स नावाचे बॅनर लावण्यात आलेले होते. चोरट्यांना हे सर्व सोन्याचेच दुकान असल्याचे वाटले. मात्र दुकाना फोडल्यानंतर हे इतर दुकाना असल्याचे आढळून आले. चोरट्यांना या दुकानातून फक्त दोन ते तीन हजाराची चिल्लर मिळाली. त्यानंतर चोरट्यांनी बाजुला असलेल्या सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला मात्र हे दुकान फुटले नाही. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा होता. कॅमेरा आधीच चोरट्यांनी फोडल्याचे सांगण्यात आले.


सिरसाळा येथील चांदनगर परिसरात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एक नाही दोन नाही एकाच लाईनमध्ये असलेल्या ५ दुकाना चोरट्यांनी फोडल्या. विशेष म्हणजे फोडलेल्या सर्व दुकानांवर वैद्यनाथ ज्वेलर्स नावाचे बॅनर लावण्यात आलेले होते. चोरटयांना वाटले हे सर्व सोन्याचे दुकाना आहेत. म्हणून त्यांनी या पाचही दुकानात चोरी केली. दुकाना फोडल्यानंतर या दुकाना सोन्याचे नसल्याचे निदर्शनास आले असावे. चोरट्यांना या पाच दुकानात दोन ते तीन हजार रुपयांची चिल्लर मिळाली. जे ओरिजनल सोन्याचं दुकान होतं ते दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते दुकान चोरट्यांना फोडता आलं नाही. या दुकानेत सीसीटीव्ही कॅमेरा होता. चोरट्यांनी प्रथम बाहेरचे कॅमेरे फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एकाच रात्री पाच ठिकाणी चोर्‍या झाल्याने सिरसाळा येथील व्यापार्‍यात खळबळ उडाली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!