Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमडॉक्टरावर हल्ला करत खिशातील मोबाईल, रोख रकमेसह सोने पळविले

डॉक्टरावर हल्ला करत खिशातील मोबाईल, रोख रकमेसह सोने पळविले


बीड (रिपोर्टर):- शेतकर्‍याच्या शेळीवर उपचार करून दुचाकीवरून गावाकडे परतणार्‍या एका डॉक्टरवर अज्ञात दोघांनी हल्ला करून जबर मारहाण करत खिशातील मोबाईल, पैशे आणि गळ्यातील सोने लंपास करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाळकृष्ण कारभारी खरात (वय २४ वर्षे, रा. डाकु पिंप्री ता. पाथर्डी, जि. परभणी) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. त्यांनी सिरसाळा पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते डिग्रस येथील बळीराम उघडे यांच्या शेळीवर औषधोपचार करून डिग्रस ते पोहनेर रोडने त्यांच्या गावी डाकुपिंप्री येथे जात असताना कोथरुळ गावाजवळ लहान चारी जवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व जिवे मारण्याची धमकी दिली. बळजबरीने खिशातील मोबाईल, नगदी रोख आणि एक ग्रॅम सोन्याचा ओम चाकुचा धाक दाखवून बळजबरीने हिसकावून घेतला व उजव्या हाताच्या दंडावर चाकु मारून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ३९४, ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विघ्ने हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!