Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमडोक्यात मुसळ घालून मुलाने केला आईचा खून, चौसाळा येथे घडली थरारक घटना;...

डोक्यात मुसळ घालून मुलाने केला आईचा खून, चौसाळा येथे घडली थरारक घटना; फरारी आरोपीला उमापूरजवळ केले जेरबंद

केज/नेकनूर/चौसाळा (रिपोर्टर):- दारूच्या नशेत तर्रर असलेल्या 27 वर्षीय दिवट्या मुलाने आपल्या आईच्या डोक्यात रात्रीच्या दरम्यान मुसळ घालून तिचा निघृणपणे खून केल्याची थरारक घटना चौसाळा येथील शाहूनगर भागात घडली. या घटनेची माहिती सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी डिवायएसपी पथक, नेकनूर पोलीस आणि चौसाळ्याचे पोलीस दाखल झाले होते. आरोपी पुत्र खून करून पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र नेकनूर पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला उमापूर फाट्याजवळ जेरबंद केले. या प्रकरणी दोषी मुला विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मदन पांडुरंग मानगिरे (वय 27) हा दारूच्या आहारी गेलेला होता. तो दररोज दारू पिवून आपल्या आईसोबत भांडण करत असे. रात्रीच्या दरम्यान त्याने आपल्या आई प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे (वय60) हीच्या डोक्यात मुसळ मारून तिचा निर्घृणपणे खून केला. सदरील हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर डिवायएसपी पथकातील कर्मचारी शेख जमीर, पप्पू अहंकारे, नेकनूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पीएसआय जाधव व चौसाळ्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून करून आरोपी मदन मानगिरे पळून जाण्याच्या बेतात होता. तो गेवराई मार्गे जात असल्याची माहिती लक्ष्मण केंद्रे यांना झाल्यानंतर त्यांनी समाजसेवक विवेक कुचेकर यांना सोबत घेवून त्याचा पाठलाग केला. व त्यास उमापूर फाट्याजवळ जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चौसाळ्यामध्ये अनाधिकृतपणे दारूची विक्री

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे दारूची विक्री होत आहे. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या परिसरामध्ये हातभट्टी दारूची विक्री होत आहे. सदरील हातभट्टी दारू आता तरी बंद होईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना बळ का देत आहे? अवैध धंदे व दारूमुळे सर्वसामान्यांचे संसार उद्धवस्त होत असतांनाही पोलीस याची दखल का घेत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!