• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

धक्कादायक! धडाकेबाज केंद्रेकरांची स्वेच्छा निवृत्ती

by Beed Reporter
June 27, 2023
Reading Time: 1 min read
0
धक्कादायक! धडाकेबाज केंद्रेकरांची स्वेच्छा निवृत्ती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


लोकाभिमुख अधिकारी म्हणून राज्यभरात केंद्रेकरांची ओळख; स्वेच्छा निवृत्ती मागच्या निर्णयाने सर्वसामान्यात नाराजी
शिंदे-फडणवीस सरकारकडूनही स्वेच्छा निवृत्ती तात्काळ मंजूर; गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रेकरांनी शेतकर्‍यांसाठी केली होती दहा हजाराची मागणी

बीड (रिपोर्टर): धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केेलेला अर्ज राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केला आहे. अचानक केंद्रेकरांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आजपर्यंत सुनील केंद्रेकर यांनी कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य यांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देत आपले कर्तव्य पार पाडले आहे. सरकारने त्यांच्यावर जीही जबाबदारी दिली ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेले आहेत. त्यामुळे केंद्रेकर हे जिथे जातील तेथे प्रशासनातले हिरो ठरत आले आहेत. बीडमधून बदली झाली तेव्हा त्यांची बदली रद्द करण्यासाठी अवघा जिल्हावासिय एकवटून रस्त्यावर उतरला होता. संभाजीनगरमध्येही त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक होत आले आहे. शहर पाणीपुरवठा योजना पुर्ण त्यांच्याच नेतृत्वाखाली व्हावी, यासाठी कोर्टानेच बदली रोखली होती. अशा सनदी अधिकार्‍याने स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, हे सर्वसामान्यांसाठी धक्कादायक आहे.

विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात 10 हजार एकरी मदत शेतकर्‍यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकार्‍यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी 2019 मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील 30 जून 2023 पर्यंत त्यांची बदली रोखली होती.
आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले.

मला ‘माननीय’ म्हणू नका
साधी राहणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मागील वर्षी कामानिमित्त खुलताबाद येथे गेले असता पत्नीसह त्यांनी बाजार केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अगदी खांद्यावर पिशवी घेऊन केंद्रेकर यांनी बाजार केला होता. दरम्यान, त्यांनी पुणे येथे कृषी आयुक्त असताना, मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, अशी भूमिका घेत तसे परिपत्रकच काढले होते. अधिकारपदामुळे मिळणारी विशेष प्रतिष्ठा’ नाकारण्याचे धाडस नाकारणारा, लोकांची नेमकी अडचण ओळखणारा अधिकारी अधिक काळ जनसेवेत राहावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

बीडमधला कार्यकाळ अविस्मरणीय
अवघा जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना अशा परिस्थितीत दुष्काळ हाताळताना चार्‍यापासून पाण्यापर्यंत, जनावरांपासून माणसांपर्यंत योग्य नियोजन शासकीय मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत देण्याचा काटेकोर प्रयत्न केंद्रेकरांनी केला होता. त्यांच्याच काळात बीड शहरातले अतिक्रमणे काढण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांसाठी आठवड्यातून एकदिवस लोक दरबारासाठी दिला होता. यासह अन्य कामे तात्काळ पुर्ण करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांची बदली झाल्यानंतर अवघा जिल्हा रस्त्यावर उतरला होता.

Previous Post

एक हजार रुपयांची लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ

Next Post

प्रखर-जेपीच्या भुमीत ऐक्य!

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
प्रखर-जेपीच्या भुमीत ऐक्य!

प्रखर-जेपीच्या भुमीत ऐक्य!

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?