Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमसुरळेगावच्या राशन दुकानदाराला बदडले

सुरळेगावच्या राशन दुकानदाराला बदडले


बीड (रिपोर्टर)- तुझे राशन दुकान मला दे, तु लई माजलास, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत राशन दुकानदाराला बदडल्याची घटना काल सुरळेगाव येथे घडली असून या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आरोपी जयदेव एकनाथ कदम याच्याविरोधात कलम ३२४, ५०४, ५०६ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगाव येथील आत्माराम सर्जेराव कदम यांच्याकडे राशन दुकान आहे. ते त्यांच्या घरी असताना आरोपी जयदेव एकनाथ कदम हा त्यांच्याकडे आला व त्यास ‘तुझे राशन दुकान मला दे,’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत करू लागला. या वेळी आत्माराम कदम यांच्या उजव्या हातावर आरोपी जयदेव याने लोखंडी गजेने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नाईक वनवे हे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!