Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज आढळले ५७ पॉझिटिव्ह

आज आढळले ५७ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून अजूनही अनेक शिक्षकांच्या तपासण्या राहिलेल्या आहेत. काल दिवसभर शिक्षकांसह अनेकांनी कोरोना टेस्टे केल्या, आज दुपारी पावणे एक वाजता आरोग्य विभागाला त्यातील १६४० अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ५७ जण बाधीत आढळून आले असून ५८३ जण निगेटिव्ह आले आहेत. मात्र यामध्ये शिक्षक पॉझिटिव्ह किती याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. काल आलेल्या अहवालात ९९ जण बाधीत आढळून आले होते. आज आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात ५७ जण बाधीत आढळून आले असून यामध्ये अंबाजोगाई ११, आष्टी ६, बीड १९, धारूर २, गेवराई ५, केज २, माजलगाव २, परळी १, पाटोदा २, शिरूर ४, तर वडवणीत ३ रुग्ण आढळून आले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!