Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रएलपीजी सिलेंडरसाठी मोजावे लागू शकतात १००० रुपये; अनुदानही रद्द होण्याची शक्यता

एलपीजी सिलेंडरसाठी मोजावे लागू शकतात १००० रुपये; अनुदानही रद्द होण्याची शक्यता


मुंबई (रिपोर्टर)-वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर सरकार एलपीजी सिलेंडरवर मिळणारं अनुदानही रद्द करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणताही अधिकृत माहिती दिली आहे.


रिपोर्टनुसार, एलपीजी सिलेंडरच्या अनुदानासंबंधी सरकार दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणार्‍या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही.

Most Popular

error: Content is protected !!