सेवकांच्या सहीशिवाय मस्टर काढण्यात येऊ नये
बीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या देखरेखीसाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली, मात्र ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वेळेवर काढण्यात येत नाही. मानधनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. आज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये अनेक ग्रामरोजगार सेवकांचा सहभाग आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या सहीशिवाय मस्टर काढण्यात येऊ नये, ग्रामपंचायतमध्ये कामाची संख्या ठरवून टार्गेट वाटप करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांचे वेळेवर मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्व ग्रामरोजगार सेवकांचा सहभाग आहे. दरम्यान शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.