Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedचिंचपूर जवळ पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेले एकाचा मृतदेह रात्री तर दुसर्‍याचा...

चिंचपूर जवळ पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेले एकाचा मृतदेह रात्री तर दुसर्‍याचा आज सकाळी मिळाला

माजलगावच्या डॅममध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला
बीड/माजलगाव (रिपोर्टर)- गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये धुव्वाधार पाऊस होत असल्याने नद्या-नाले तुडूंब वाहत आहेत. अनेक ठिकाणचे पुल वाहून गेले आहे तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्री धारूर तालुक्यातील उंदरी येथील दोघे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने मोटारसायकलसह दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. एकाचा मृतदेह रात्री सापडण्यात आला तर दुसर्‍याचा मृतदेह आज सकाळी घटनास्थळापासून चार कि.मी. अंतरावर आढळून आला. तर माजलगावच्या डॅममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला असून सदरचा व्यक्ती कोण आणि कुठला हे अद्याप समजले नाही. मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.


धारूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. रात्री उंदरी येथील दोघे जण मोटारसायकल (क्र. एम.एच. 44 एम. 7829) या गाडीवर बसून गावाकडे निघाले होते. चिंचपूर रस्त्यावरील नदीच्या पुलावरून पाणी जात असताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटारसायकल स्वाराने पाण्यात मोटारसायकल घातली. त्याच वेळी मोटारसायकलसह हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. याची माहिती गावकर्‍यांना समजल्यानंतर गावकर्‍यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता महादेव सोनवणे हे मृतावस्थेत रात्री मिळून आले तर आज सकाळी उत्तम सोनवणे यांचा मृतदेह गावकर्‍यांना मिळून आला. तिकडे माजलगावच्या डॅममध्येही एक मृतदेह वाहून आला असून आज सकाळी सदरचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर तो बाहेर काढण्यासाठी स्थानीक प्रशासन प्रयत्न करत होते. सदरच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Most Popular

error: Content is protected !!