Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईनाथ सागराचे १८ दरवाजे उघडले ९ हजार ४४७ क्यूसेकने विसर्ग

नाथ सागराचे १८ दरवाजे उघडले ९ हजार ४४७ क्यूसेकने विसर्ग


गेवराई (रिपोर्टर) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे नाथसागर पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात ९५ टक्के पेक्षा जास्त जलसाठा आसून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत तर धरणाच्या निम्न बाजूतील गोदावरी नदीवरील सर्व उच्च पातळी बंधार्‍यामध्ये सुध्दा १०० टक्के जलसाठा आहे. धरणात पाण्याची आवक ६४ हजार ६२३ क्युसेक्सने असून दर तासाला पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान येणार्‍या पाण्याच्या वेग पाहता आज सकाळी ११ वा. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून यातून १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू असून त्यामुळे गोदाकाठी पुरस्थिती निर्माण होईल अशी शक्यता असल्याने गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पूर परिस्थिती झाली तर स्थानिक प्रशासन सज्ज आल्याचे प्रभारी तहसीलदार रामदासी यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

पूर नियंत्रण कक्षाकडूनही सावधानतेचा ईशारा
काल दिनांक २८-०९-२०२१ पासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्यस्थितीत देखील जोरदार पाऊसाचा ईशारा दिलेला असल्यामुळे आज दि. २९-०९-२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत एकूण ९२.३१% जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत असल्याने आज सकाळी ११ वा. द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले असून यातून ९ हजार ४४७ क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष जायकवाडी प्रकल्प, पैठण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!