Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeशेतीशेतकर्‍यांच्या हत्येचं पाप भाजपाचं, 11 तारखेच्या महाराष्ट्र बंदमध्ये शांततेने आंदोलन करा...

शेतकर्‍यांच्या हत्येचं पाप भाजपाचं, 11 तारखेच्या महाराष्ट्र बंदमध्ये शांततेने आंदोलन करा -शरद पवार


सोलापूर (रिपोर्टर)- देश शेतीप्रधान आहे. 60 टक्के लोक शेती करतात. मात्र शेतीप्रधान देशातच शेतकर्‍यांची परिस्थिती खालावली. केंद्र सरकारने शेतकर्‍यांना मदत पोहचवली नाही तर उलट शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर भाजप सरकारने गाड्या घातल्या, त्यांना चिरडलं. शेतकर्‍यांच्या हत्येचं पाप भाजपाने केलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारच्या निषेधार्थ परवा 11 ऑक्टोबर रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

ते सोलापूर येथे आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी बोलताना खा. शरद पवार यांनी भाजपावर सडकावून टिका केली. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचे सर्वांना दिसत आहे. आज केंद्र सरकार देशातील रेल्वे स्तानकाचं खासगीकरण करण्याचं काम करत आहे, नेहरुंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला होता. मात्र मोदी सरकार सर्व गोष्टी व्यापार्‍यांच्या हातात देत आहे. बंदर, विमानतळ, दळणवळणाचे साधन या सर्व गोष्टींच्या खासगीकरणाचे प्रयत्न केेंद्र सरकारकडून सुरू आहे. वाढत्या महागाईला केेंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत इंधन दरवाढीला मोदी सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. शेतीप्रधान देशात शेतकर्‍यांची परिस्थिती खालावली आहे. त्या शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर भाजप गाड्या घालत आहे. त्यांना चिरडत आहे. हे निषधार्ह आहे. भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी 11 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन शरद पवारांनी केले. मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या घरी आणि संबंधित व्यक्तींच्या कार्यालयावर आयकर विभाग छापा टाकत आहे. यावर बोलताना शरद पवारांनी भाजपाला टोला लगावला. अजित पवारांच्या घरी पाठवलेल्या सरकारी पाहुण्यांची आम्हाला चिंता वाटत नाही, कोणत्याही पाहुण्यांची आम्हाला कधी चिंता नसते. माझा संबंध नसलेल्या बँकेशी मला जोडून ईडीने नोटीस पाठवली. यानंतर लोकांनी भाजपाला वेडी ठरवले, असेही या वेळी पवार बोलले. लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी रस्त्यावर आले. आमच्या प्रश्नांकडे भाजपाचं सरकार दुर्लक्ष करतं याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी ते आले. तिथे शेतकरी आल्यानंतर भाजपाचे नेते रस्त्याने जात असताना त्या शेतकर्‍यांच्या अंगावर त्यांनी गाड्या घातल्या. 8 लोक मृत्यूमुखी पडले. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढून जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांची माहिती मागवली आहे. लोकांनी हातात सत्ता लोकांचं भलं करण्यासाठी दिली आहे याचं विस्मरण भाजपा सरकारला झालं आणि त्यांनी शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं. याचा संताप पूर्ण देशात आहे, असं शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!