जावयासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल
शिरूर (रिपोर्टर): मेडीकल टाकण्यासाठी तीन लाख रुपये का देत नाही? या कारणावरून जावयाने सासरवाडीमध्ये येऊन धिंगाणा घालत चुलत सासर्यासह मध्यस्थी करणार्यांना मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथे घडली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव सोनराव आघाव यांची पुतणी शुभांगी हिचे एक वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील अभिजीत अशोक पालवे याच्या सोबत लग्न झाले. लग्नानंतर अभिजीत याने मेडीकल टाकण्यासाठी सातत्याने तीन लाख रुपये मागत असे. काही दिवसांपूर्वीच शुभांगी ही बारगजवाडी येथे आपले चुलते वासुदेव आघाव यांच्याकडे डिलेव्हरीसाठी आली होती.
तिची डिलेव्हरी झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. 26 ऑगस्ट 2023 रोजी अभिजीत पालवे व राणा प्रताप पालवे हे दोघे भाऊ सासरवाडीमध्ये आले व त्यांनी पुन्हा पैशासाठी तगादा लावत वासुदेव आघाव सह इतर मध्यस्थी करणार्यांना मारहाण केली. या प्रकरणी दोघा बंधूंविरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.