Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईदुकाना उघड्या ठेवा म्हणणारे शेतकरी विरोधी आहेत का?, शेतकरी मरतायत, चिरडले जातायत,...

दुकाना उघड्या ठेवा म्हणणारे शेतकरी विरोधी आहेत का?, शेतकरी मरतायत, चिरडले जातायत, तुम्ही राजकारण करता, शेतकर्‍यांचा तळतळाट घेऊ नका, शेतकरी संतापला


बीड (रिपोर्टर):- शेतकर्‍यांविरोधात तीन कृषी कायदे केल्याने केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी आक्रोष करत कायदे मागे घेण्याबाबत आंदोलन करत आहेत. या परिस्थितीत आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या अंगावर उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे भाजपाच्या मंत्री पुत्राने अंगावर गाडी घालून चिरडले. यात 8 जणांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी याला विरोध करत दुकाना उघड्या ठेवण्याचे आवाहन करत आहे. बीड जिल्ह्यातही भाजपासह काही व्यापारी बंदला विरोध करून व्यवसाय चालू ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. हे सर्व शेतकरी विरोधक आहेत का? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांसह कष्टकर्‍यांनी केला आहे.


महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात व्यापार्‍यांनी आपले व्यावसाय सकाळपासून बंद ठेवले. मात्र काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने व्यापार्‍यांना दुकाना उघडण्याबाबत आवाहन केले. यामध्ये काही काळ तणावही दिसून आला. राजकीय लाभासाठी सत्ताधारी असो या विरोधक हे व्यापार्‍यांच्या खांद्यावर बंदुका ठेवत आहेत. परंतू वस्तुस्थितीनुसार शेतकरी गेल्या वर्षभरापासून काळ्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनामध्ये अनेक शेतकर्‍यांनी बलीदानही दिलं आहे. त्यात भाजपा मंत्री यांच्या पुत्राने लखीमपुर खेरी येथे शेतकर्‍यांना चिरडले हा संतापजनक प्रकार आहे. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आहे. परंतू शेतकर्‍यांच्या या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत काही व्यापार्‍यांसह भाजप दुकाना उघड्या ठेवण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यात संताप असून दुकाना उघड्या ठेवा म्हणणारे शेतकरी विरोधी आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!