मुंबई (रिपोर्टर): देशात भाजपाला रोखण्यासाठी देशभरातील सर्वच पक्षांचे नेते मुंबईत डेरेदाखल असून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट आघाडी म्हणजेच ‘इंडिया’च्या तिसर्या बैठकीच्या दुसर्या दिवशी सात सदस्यीय समिती स्थापन झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. बैठक होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एक फोटोसेशन झाले.
देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात येथे बैठक सुरू आहे. बैठकीच्या दुसर्या दिवसाची सुरुवात होण्याआधी सर्व नेत्यांनी एकत्रित फोटोसेशन केले. या फोटोसेशनच्या वेळी पहिल्या रांगेत उभे असलेले उद्धव ठाकरे हाताची घडी घालून होते तर राहुल गांदी मात्र दाटीवाटीत उभे दिसले. ठाकरे गटाचे संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या रांगेत जागा मिळाली असून यामध्ये महेबूबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जून खर्गे, एम.के. स्टॅलीन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारुक अबदुल्ला या नेत्यांचा समावेश होता. तर दुसर्या रांगेमध्ये आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते उभे दिसले. बैठकीला सुरुवात झाली असून इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या समन्वय समितीमध्ये महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. तर देशभरातून एम.के. स्टॅलीन, तेजस्वी यादव, अभिशेख बॅनर्जी, राघव चड्डा, लल्लन सिंग, जावेद अली खान, डी. राजा, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, महेबुबा मुफ्ती या नेत्यांचा समितीमध्ये समावेश आहे.