जालना (रिपोर्टर): सराटे अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या बेछुट लाठीमाराबाबत सरकारने गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. आज जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी सराटे अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटून जाळपोळीच्या घटना घडल्या. संतप्त समाज राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी करत आहे. सदरचा प्रकार हा केवळ पोलिसांच्या लाठीमारामुळे झाला आणि हा लाठीमार सरकारच्या आदेशावरून करण्यात आला, असा एकीकडे आरोप होत असताना आज सरकारने यामध्ये लक्ष घातल्याचे दिसून येते. एसपी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकारने अंतरवली प्रकरणाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.







