Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबागपिंपळगावमध्ये बैलजोडी तर रांजणीत शेतकर्‍याची गाय चोरीला

बागपिंपळगावमध्ये बैलजोडी तर रांजणीत शेतकर्‍याची गाय चोरीला


गेवराई (रिपोर्टर):- गेवराई शहरासह परिसरात भुरट्या चोरट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने चोरटे चोर्‍या करून बिनधास्त फिरत आहेत. गेवराई तालुक्यातील रांजणी येथील एका शेतकर्‍याची गाय तर बागपिंपळगाव येथील एका शेतकर्‍याची बैलजोडी आणि गाय काल रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रांजनी येथील पवन आत्माराम सावंत या शेतकर्‍याने शेतात बांधलेली 20 हजार रूपयाची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेली तर बागपिंपळगाव येथील ज्ञानेश्‍वर यशवंत सगळे या शेतकर्‍याने त्यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेडमध्ये बांधलेली बैलजोडी व एक गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्या जनावरांची किंमत 55 हजार रूपये आहे. या प्रकरणी गेवराई पोलीसात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!