Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमधारदार शस्त्राने रिक्षाचालकावर वार पेठबीड पोलीसात गुन्हा दाखल

धारदार शस्त्राने रिक्षाचालकावर वार पेठबीड पोलीसात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)ः- धारदार शस्त्राने एका 31 वर्षीय रिक्षा चालकावर वार करुन गंभीर जखमी केल्याचा घटना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदणी चौकात 22 ऑक्टोंबर घडली. या प्रकरणी युवकांने तक्रार दिल्यावरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रकांत श्रीरंग भालशंकर (वय-31 वर्षे रा.ढोरवाडा चांदणी चौक) या रिक्षाचालकाने पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिपक दिलीप जाधव (रा.चांदणी चौक मांगवाडा बीड ) याने तु मला फोन पे वरुन पैसे का टाकत नाही असे म्हणून शिवीगाळ करत कुकरी सारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार करुन जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी केली. या प्रकरणी रिक्षा चालकाने पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दिपक जाधव याच्या विरोधात कलम 324, 504,506 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पवार हे करत आहे.

Most Popular

error: Content is protected !!