Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडखाजगी सावकाराकडून एकास बेदम मारहाण घेतलेले पैसे परत देवूनही एक लाखाची केली...

खाजगी सावकाराकडून एकास बेदम मारहाण घेतलेले पैसे परत देवूनही एक लाखाची केली मागणी


बीड (रिपोर्टर)ः- शेतीच्या कामासाठी एका व्यक्तीने विस हजार रुपये एका खाजगी सावकाराकडून घेतले होते. ते पैसे परत देवूनही वरून एक लाख रुपयाची मागणी करत शेतकर्‍याला बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृत भाऊसाहेब देशमुख (वय-44 वर्षे,रा.कन्नापूर ता.धारुर.ह.मु.बौध्दविहाराच्या बाजूला सिरसाळा) यांनी सिरसाळा पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नवनाथ मुंडे रा.तळेगांव ता.परळी यांच्याकडून शेतीच्या कामासाठी 20 हजार रुपये घेतले होते. ते परत दिले तरी देखील एक लाख रुपये तुझ्याकडे बाकी राहीले आहे ते मला दे असे म्हणत 29 ऑक्टोंबर रोजी मुंडे यांनी देशमुख यांच्या घरी जावून त्यांना मोटार सायकलवर बसवून पिंपळगांव फाटा येथे नेवून पैसे का देत नाही म्हणत मुंडे यांनी देशमुख यांना फायटरने पोटात मारहाण केली. व पुन्हा मोटार सायकलवर बसवून पांगरी कारखान्याच्या पाठीमागे नेवून तेथे लाथा बुक्याने मारहाण केली. व तेथून थर्मल कॉलनी विश्रामगृहाच्या पाठीमागे नेले व तेथे चार ते पाच अनोळखी इसमाने मारहाण केली. व संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तेथे बसवून ठेवले. व सोनेराव उर्फ भगवान शेषेराव मुंडे यांने लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी देशमुख यांनी सिरसाळा पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी नाथाराव मुंडे, सतिष मुंडे, मनोहर गणपत मुंडे, सोनीराव उर्फ भगवान शेषेराव मुंडे, सोमनाथ व अन्य चार लोकांवर कलम 326, 323,143, 147, 148, 149 भादवी नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेळके हे करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!