Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडसंस्थाचालकाच्या विरोधात कर्मचार्‍याचे कुटुंबासमवेत आमरण उपोषण

संस्थाचालकाच्या विरोधात कर्मचार्‍याचे कुटुंबासमवेत आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर):- नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयाने शासनाच्या आदेशाचे पालन केले नसून ते माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने या संस्थेच्या विरोधात कर्मचार्‍याचे कुटुंबासमवेतत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू आहे.

तुकाराम देवराव गर्जे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय बीड सांगवी ता.आष्टी या शाळेच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. सदरील शाळेकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे गर्जे यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद प्रशासनही आपण दिलेल्या अर्जाकडे दुर्लक्ष करत असून सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी तुकाराम गर्जे कुटुंबियांसमवेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.

Most Popular

error: Content is protected !!