Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडखासगी वाहनातून प्रवास करणार्‍या दाम्पत्याला लुटले महिलेने माध्यमांसमोर सांगितली आपबिती

खासगी वाहनातून प्रवास करणार्‍या दाम्पत्याला लुटले महिलेने माध्यमांसमोर सांगितली आपबिती


बीड (रिपोर्टर)- दिवाळी निमित्त माहेरी अक्कलकोट येथे गेलेली बीड येथील महिला आपल्या पती-मुलासह काल खासगी प्रवासी वाहतुकीने बीडकडे येत असताना वाहन चालकाने चौसाळ्याजवळ सदरील महिलेसह पतीस धाक दाखवत लुटल्याची घटना घडली. या वेळी महिलेच्या कानातील आणि गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण संबंधिताने लुटल्याचे सदरील महिलेने माध्यमाला सांगितले.

बीड येथील नम्रता धनुरे ही महिला दिवाळीसाठी माहेरी अक्कलकोट येथे गेली होती. काल आपल्या पती व लहान मुलासह ती खासगी प्रवासी वाहतुकीने बीडकडे येत होती. रस्त्यात चौसाळ्याजवळ वाहन चालकाने सदरील दाम्पत्यास दाबदडप करत गाडीच्या खाली उतरवले, तत्पुर्वी धमकावून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, सोन्याचे कानातले, दोन मोबाईल व त्यांच्या पिशव्या घेऊन ते निघून गेले. सदरची आपबिती महिलेने माध्यमाला सांगितली. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप असल्याने एसटी प्रवास बंद आहे. त्यामुळे पर्याय नसल्याने खासगी वाहतुकीतून प्रवास करावा लागतो. असे म्हणत या महिलेने एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असून त्या पुर्ण करत एसटी प्रवास सेवा तात्काळ सुरू करण्याचे म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!