Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडएसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस कर्मचार्‍यांनी केले अर्धनग्न आंदोलन

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस कर्मचार्‍यांनी केले अर्धनग्न आंदोलन


बीड (रिपोर्टर)- एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे. संपाचा आज सहावा दिवस असून महामंडळाच्या कार्यालयासमोर आज कर्मचार्‍यांनी अर्धनग्न आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. जोपर्यंत आपली मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला. सहा दिवसांपासून एसटी बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होऊ लागले आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या मागण्या राज्य सरकार पुर्ण करत नसल्याने कर्मचार्‍यांनी संप पुकारलेला आहे. या संपामुळे महामंडळाचे दररोज लाको रुपयांचे नुकसान होत आहे. आज संपाचा सहा दिवस आहे. कर्मचार्‍यांनी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. शासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून महामंडळाचे विलिनीकरण तात्काळ करावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी लावून धरली. जोपर्यंत सरकार मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला आहे. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या या संपामुळे एसटी बसेस पुर्णत: बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!