Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआ. धसांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा रास्ता रोको शेतकर्‍यांचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या, वाहतूक दीड...

आ. धसांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा रास्ता रोको शेतकर्‍यांचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या, वाहतूक दीड तास ठप्प


आष्टी (रिपोर्टर)- हरिनारायण आष्टा व टाकळसिंग महसूल मंडळात मोठी अतिवृष्टी होऊन शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले असताना शासन-प्रशासनाने या भागातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही. 32 गावे वगळून त्या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय केला. याच्या निषेधार्थ आज भाजपाचे आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर उतरले. बीड-नगर महामार्गावरील चिंचपूर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. दीड ते दोन तासांच्या रस्ता रोको आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. आंदोलनात परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. आ. धस स्वत:हून बैलगाडीत आंदोलनस्थळी आले. या वेळी आ. धसांनी हरिनारायण आष्टा येथे पर्जन्यमापक यंत्र नाही मग कशाच्या आधारे मंडळे वगळले? तालुक्याचे कारभारी व प्रशासनाचे गौडबंगाल समजत नसल्याचे सांगून शासनासह प्रशासन व्यवस्थेवर हल्ला चढवला.


पुढे बोलताना धस म्हणाले की माझ्या आयुष्यात ऐवढा कधीच पाऊस झाला नाही आष्टा मंडळाला पर्जन्यमापक यंत्र नाही, 65 मि मी पाऊस झाला की दुसर्‍या दिवशी पंचनामे झाले पाहिजेत अधिकार्‍यांना सांगितले तर ते म्हणतात वरुन आदेश आले नाहीत.मदत पुनर्वसन खाते माझ्याकडे असल्याने मला चांगली माहिती आहे.सरकार फक्त मोठ मोठे पॅकेज जाहीर करतय पण प्रत्यक्षात शेतक-यांना काहीच मिळत नाही.11 हजार कोटीचे पॅकेज जाहीर, पण शेतकर्‍यांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे. तालुक्याच्या आमदाराने म्हणायचे 116 कोटी आले पण शेतक-यांची दिवाळी झाली नाही नुसत्या बातम्या देऊ नका आष्टा व टाकळसिंग मंडळ सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करा तालुक्याचे कारभारी यांचे काम असते प्रस्ताव तयार करायचा मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडुन निधी आणायचा अधिवेशनापर्यंत मदत करा अन्यथा तहसिल प्रशासनाला जाब विचारु पेपरच्या

बातम्या सत्ताधा-यांची कमी कराव्यात 32 गावांना सततच्या पावसाने गावांचे नुकसान तालुक्याच्या प्रशासनाने काय अहवाल दिला यामागचे गौडबंगाल निघले पाहिजे स्थानिक आमदारांनी अहवाल तयार करुन मदत मिळवून द्यावी यावेळी जि.प.सदस्य माऊली जरांगे, जि. प. सदस्य अमरराजे निंबाळकर, सभापती बद्रीनाथ जगताप, गणेश शिंदे, पं.स.सदस्य यशवंत खंडागळे, गणेश डोंगरे, अ‍ॅड.बाळासाहेब झांबरे,
सरपंच गंगाधर पडोळे, (क-हेवडगांवचे सरपंच परिवंत गायकवाड,भगवानराव सांगळे,बाळू नागरगोजे,मा.सरपंच केशव बांगर,मा. सरपंच गंगाधर गायकवाड,शिवा घुले,सदस्य जालिंदर खांडवे,चिंचपूरचे सरपंच रंगनाथ गाडे,सरपंच अजित तात्या घुले,संदिप कारंजकर,संजय गायकवाड,राम सांगळे,मातकुळीचे सरपंच आप्पासाहेब जरे,सरपंच सतिश धस,उपसरपंच सुग्रीव नागरगोजे,सदस्य अशोक विधाते,अर्जुन बांगर,विशाल खांडवे,सरपंच महादेव गळगटे,मातावळी वनवेवाडी सरपंच विष्णू वनवे,अमोल राजे घुले,विष्णु खाडे,श्रीधर खांडवे,भाऊ धोंडे,मनोहर डोके,उपसरंच बापूसाहेब डोके,धनंजय डोके,संतोष डोके,नवनाथ डोके,आदी उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!