Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमअवैध वाळुचे दोन टिप्पर पकडले गेवराई महसूलची कारवाई

अवैध वाळुचे दोन टिप्पर पकडले गेवराई महसूलची कारवाई


गेवराई (रिपोर्टर)- गोदापात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत आहे. वाळुचा उपसा करून त्याची वाहतूक टिप्पर द्वारे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन टिप्परचा पाठलाग करून एक नांदूर हवेली तर दुसरे पेंडगाव येथे पकडले. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी बीड महसूलच्या स्वाधीन हे टिप्पर करण्यात आले.

गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पहाटे गेवराई येथे सापळा लावून दोन टिप्पर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते टिप्पर सुसाट वेगाने बीडकडे निघाले. त्यांचा पाठलाग करत एक टिप्पर नांदूर हवेली तर दुसरे टिप्पर पेंडगाव येथे सकाळी सात वाजता पकडण्यात आले. या वेळी त्यांना बीडच्या महसूलची मदत मिळाली. ही कारवाई गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, मंडळ अधिकारी अंगद काशीद, सचिन सानप, तलाठी दादा शेळके, सोळसे, शरद झोडगे, राऊत यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!